महाड: महाडमधील पाण्याचे संकट लवकरच दूर होणार
Mahad, Raigad | Jun 6, 2026 महाड शहरावर निर्माण झालेल्या भीषण पाणीटंचाईच्या संकटावर मात करण्यासाठी राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री ना. भरतशेठ गोगावले यांनी आज प्रत्यक्ष तालुक्यातील नडगाव जवळ असलेल्या जलस्रोताची प्रत्यक्ष पाहणी केली. त्या ठिकाणी असलेल्या पाणीसाठ्याचा उपयोग महाड शहरातील टंचाईग्रस्त भागाला करण्यात यावा यासाठी पर्यायी व्यवस्था तातडीने करण्यात यावी असे स्पष्ट निर्देश ना. भरत गोगावले यांनी दिले. शहरातील पाणीटंचाई वर तातडीने उपाययोजना करण्यासाठी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीमध्ये त्यांनी वरील आदेश दिले.