कामठी: : हद्दपार आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यास अटक
नवीन कामठी पोलीस ठाणे हद्दीतील जयस्तंभ चौकात हद्दपार असतानाही विनापरवाना आढळलेल्या शेख सलमान उर्फ अब्बू (वय २८, रा. चित्तरंजन नगर) याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीवर पोलीस उपायुक्तांनी हद्दपारीची कारवाई केली होती, मात्र आदेशाचे उल्लंघन केल्याने त्याच्यावर कलम १४२ म.पो.का. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.