राळेगाव: सोनुर्ली फाटा येथे टिप्पर व कंटेनर च्या अपघातातील कंटेनर वडकी पोलिसांनी केला जप्त
भरधाव चुरी घेऊन जाणाऱ्या टिप्परला समोरून येणाऱ्या कंटेनरने जबर धडक दिल्याने या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले होते.ही घटना आज दि १ जुलै रोजी नॅशनल हायवे क्रमांक 44 वरील सोनुर्ली फाट्यासमोर घडली होती. या अपघातानंतर कंटेनर चालक पसार झाला होता.दरम्यान दि 4 जुलै रोजी 5 वाजता त्या अपघातातील कंटेनर ट्रक वडकी पोलीसांनी जप्त करून पोलीस स्टेशन वडकी येथे लावण्यात आला