धुळे: चितोड रोड येथील एका दवाखान्याची तोडफोड; शहर पोलिसात अज्ञातांविरोधात तक्रार दाखल
Dhule, Dhule | Aug 31, 2024 धुळे शहरातील चितोड रोड येथील एका दवाखान्याची कोणीतरी व्यक्तीने रात्रीच्या वेळी तोडफोड केल्याची घटना घडली आहे.अशी माहिती ३१ ऑगस्ट शनिवारी दुपारी ३ वाजून २० मिनिटांनी शहर पोलीसांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार शहरातील चितोड रोड येथे डॉ सागर जैन वय ४४ यांचा दवाखाना आहे. रात्री आठ वाजेच्या नंतर दवाखाना बंद करून डॉक्टर जयंत घरी निघून गेले. त्यानंतर ३० ऑगस्ट रात्री अकरा वाजेच्या दरम्यान एका व्यक्तीने दवाखान्यासमोर येत आरडाओरड करत शिवीगाळ करत दगड मारले.यात दवाखान्याचे खिडकीचे काच फुटून न