धुळे: आनंदखेडे गावात १४ वर्षिय मुलाला इलेक्ट्रिक शॉक लागून मृत्यू तालुका पोलीसात नोंद
Dhule, Dhule | Aug 31, 2024 धुळे आनंदखेडे गावात १४ वर्षिय मुलाला इलेक्ट्रिक शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.सदर मयत मुलाचे नाव सचिन सुभाष मोरे वय.१४ राहणार आनंखेडा तालुका जिल्हा धुळे,अशी माहिती ३१ ऑगस्ट शनिवार सकाळी ८ वाजून ५५ मिनिटांच्या दरम्यान तालुका पोलिसांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आनंदखेडा गावात राहणारा सचिन मोरे हा राहते घरात ३० ऑगस्ट शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान पाणी मोटर सुरू करण्यासाठी गेला असता.याच दरम्यान इलेक्ट्रिक वायर तुटून त्यांच्या अंगावर पडल्याने तो जमिनीवर पडला होता