महाड: महाराष्ट्र सागरी मंडळाचे वहुर जेट्टीचे काम निकृष्ट दर्जाचे
Mahad, Raigad | Apr 13, 2026 महाराष्ट्र सागरी महामंडळाकडून महाड तालुक्यातील सव येथे गरम पाण्याचे कुंड आहे या ठिकाणी जाण्यासाठी सावित्री नदीच्या पाण्यातून होडीतून जावे लागत असल्याने पर्यटकांसाठी जे टी बांधण्याचे काम करण्यात आले मात्र निकृष्ट दर्जाच्या कामामुळे तब्बल अडीच कोटी रुपये सावित्री नदीच्या पाण्यात वाहून जाणार असल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की महाड तालुक्यातील सव येथे गरम पाण्याचे कुंड आहे.