बदनापूर: तीर्थक्षेत्र राजूर येथे राजुरेश्वराच्या मंदिरात जाऊन आमदार नारायण कुचे यांनी घेतली राजुरेश्वराचे दर्शन
आज दि.3 एप्रिल 2020 वार शुक्रवार रोजी दुपारी 2 वाजता बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आ.नारायण कुचे यांनी मराठवाड्याचे आराध्य दैवत तीर्थक्षेत्र राजुर येथे राजुरेश्वराच्या मंदिरात जाऊन श्री राजुरेश्वराच्या मूर्तीचे विधिमत पूजन करत दर्शन घेतले आहे,याप्रसंगी राज्यातील तसेच मतदारसंघातील सर्व नागरिकांचे आरोग्य सुखी समाधानी सुदृढ राहो अशी प्रार्थना त्यांनी राजुरेश्वराच्या चरणी केली आहे,याप्रसंगी मंदिर समितीचे पदाधिकारी व स्थानिक भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.