बदनापूर: तालुक्यातील बाजार वाहेगाव,शेलगाव सह इतर भागातील मोसंबी बगीचे पाण्याअभावी सुकले, उत्पादक शेतकरी अडचणीत
Badnapur, Jalna | May 30, 2026 आज दिनांक 30 मे 2026 वार शनिवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास बदनापूर तालुक्यातील बाजार वाहेगाव शेलगाव सह तालुक्यात असलेल्या मोसंबी उत्पादक शेतकरी अडचणीत असल्याचे पाहायला मिळाले आहे कारण तालुक्यात मोसंबी उत्पादक बऱ्यापैकी आहे ,व सध्या जिल्ह्याचे व बदनापूर तालुक्याचे 42, 43 डिग्री सेल्सिअस तापमान आहे, त्यामुळे पाणी पातळी त झपाट्याने घट झाली आहे,व याचाच परिणाम विहिरीच्या पाण्यावर सुद्धा झाला आहे आणि मोसंबी बगीच्या ना पाणी मिळत नसल्याने मोसंबी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.