खालापूर: खालापूर पंचायत समितीवर महायुतीचा भगवा; ८ पैकी ५ जागांवर महायुतीचे वर्चस्व
खालापूर पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि आरपीआय यांच्या महायुतीने दणदणीत विजय मिळवत सत्तेचा गड सर केला आहे. या विजयामुळे खालापूर पंचायत समितीवर आता महायुतीचा भगवा झेंडा फडकला असून, महायुतीचा सभापती विराजमान होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. एकूण आठ गणांपैकी भारतीय जनता पक्षाने पाच जागा लढवल्या होत्या, त्यापैकी तीन जागांवर यश मिळवले आहे, तर शिवसेना शिंदे गटाने तीनपैकी दोन जागा जिंकून आपली ताकद दाखवून दिली आहे.