*पुण्यातील थेरगावमध्ये छठ पूजेचा उत्साह! जाणून घ्या छठ पर्वाचं धार्मिक महत्त्व; भाविकांशी खास संवाद*
बिहार आणि उत्तर भारतातील सर्वात महत्त्वाच्या सणांपैकी एक असलेला छठ पूजा उत्सव आता पुण्यातही मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. पुण्यातील थेरगाव येथे छठ पूजेच्या निमित्ताने खास ग्राउंड रिपोर्टिंग करण्यात आले.
छठ पूजा नेमकी काय आहे? या सणामागील धार्मिक श्रद्धा आणि परंपरा काय आहेत? सूर्यदेव आणि छठी मैय्याची पूजा करण्याचे महत्त्व काय आहे? तसेच चार दिवस चालणारा हा उत्सव नेमका कशा पद्धतीने साजरा केला जातो?
या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी थेट थेरगावमधील छठ पूजा स्थळी पोहोचून भाविकांशी संवाद साधला.
छठ पूजेदरम्यान भाविक निर्जळी उपवास, पारंपरिक विधी आणि मावळत्या तसेच उगवत्या सूर्याला अर्घ्य अर्पण करून श्रद्धा व्यक्त करतात. मात्र, पुण्यासारख्या शहरात हा सण साजरा करताना घाटांची उपलब्धता, स्वच्छता, पाणी आणि इतर सुविध
Pune City, Pune | Nov 15, 2026