उरण: उरणवर पाणीसंकटाचे सावट; रानसई धरण आटले
Uran, Raigad | Jun 1, 2026 उरण तालुक्याची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या एमआयडीसीच्या रानसई धरणातील पाणीसाठा धोकादायक पातळीवर पोहोचला असून, आता धरणातील मृत साठ्यातून पाणी उपसा करण्याची वेळ आली आहे. धरणात अवघे काही दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिल्याने संपूर्ण तालुक्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यंदा रानसई धरणाची पाणीपातळी गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल १० फुटांनी घटली असून, धरणाने गेल्या वर्षाच्या तुलनेत सुमारे २४ दिवस आधीच तळ गाठल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे उरण तालुक्यावर गंभीर पाणीटंचाईचे संकट उभे राहिले आहे.