बदनापूर: नानेगाव येथे गावात खराब झालेले रस्त्यांच्या गड्ड्यात बसून ग्रामस्थांनी केले आंदोलन
आज दिनांक 7 जुलै 2026 वार मंगळवार रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास बदनापूर तालुक्यातील नानेगाव येथे ग्रामस्थांनी गावांतर्गत खराब झालेल्या रस्त्यांच्या खड्ड्यात बसून त्या पाण्यात बसून आगळे वेगळे आंदोलन करत रस्ते दुरुस्त करण्याची मागणी केली आहे, यावेळी ग्रामस्थ अंकुश चव्हाण यांच्यासह इतर गावकरी व तरुण मंडळी आंदोलनात सहभागी झाले होते, ग्रामपंचायत च्या दुर्लक्ष झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असून ग्रामस्थांनी लोकशाही मार्गाने आंदोलन करत पुन्हा आंदोलन चढण्याचा इशारा दिला आहे.