हिंगणघाट: किनगाव येथे घराच्या अंगणातून दुचाकी चोरून नेणाऱ्या चोरट्यास पोलिसांनी केली अटक, खैराटी रोडवरून दुचाकी जप्त
हिंगणघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील किनगाव येथील राकेश जिवने याचे अंगात ठेवून असलेली दुचाकी क्रमांक एम एच ३२ डब्ल्यू ९८०८ २७ जुलैला रात्रीच्या अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची तक्रार हिंगणघाट पोलीस ठाण्यात केली होती.यासाठी संबधी पोलीस गुन्हा दाखल करून चोरट्याचा शोध घेतला असता किनगाव येथील साजन जीवने यास ताब्यात घेऊन विचारपुस केली असता त्याने दुचाकी चोरून नेल्याची कबूल दिली दुचाकी खैराटी रोडवर देशमुख यांचे शेताजवळ असल्याचे सांगितले पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन दुचाकी जप्त केली.