जळगाव शहराच्या विकासाला नवी गती देणाऱ्या ‘मिनी रिंग रोड’ चे भूमिपूजन
वाघनगर, पीरबाबा दर्गा आणि गाडगेबाबा चौकाला जोडणाऱ्या रस्त्याच्या कामाला सुरुवात
जळगाव : शहरातील वाहतूक गतिमान करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या शिव कॉलनी स्टॉप ते शंभर फुटी रोडपर्यंतच्या रस्ता विकास प्रकल्पाचे आज मान्यवरांच्या उपस्थितीत भूमिपूजन पार पडले. संपूर्ण वाघनगर परिसर, पीरबाबा दर्गा तसेच गाडगेबाबा चौकाला जोडणारा हा मार्ग शहरासाठी खऱ्या अर्थाने ‘मिनी रिंग रोड’ ठरणार असून, यामुळे नागरिकांची वाहतुकीची मोठी सोय होणार आहे.