महाड: उष्माघातापासून बचावासाठी आरोग्य विभागाच्या दक्षतेच्या सूचना जाहीर
Mahad, Raigad | May 1, 2026 राज्यात सध्या तापमानाचा पारा वाढत असून भारतीय हवामानशास्त्र विभागाने काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. वाढत्या उन्हामुळे होणारा उष्माघात टाळण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने नागरिकांसाठी सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. हायड्रेटेड राहा आणि स्वतःचे रक्षण करा-आरोग्य विभागाने नागरिकांना तहान लागली नसली तरीही सतत पाणी पिण्याचे आवाहन केले आहे. प्रवासात पिण्याचे पाणी सोबत ठेवावे.