बदनापूर: शेलगाव सह बदनापूर तालुक्यातील भावीक भक्तांनी शेंद्रा येथे मांगीरबाबा यात्रा उत्सवाला लावली उपस्थिती
आज दिनांक 8 एप्रिल 2026 वार बुधवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास बदनापूर तालुक्यातील शेलगाव तसेच परिसरातील हजारो भाविक भक्तांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेंद्रा येथे सालावादाप्रमाणे यावर्षीही आयोजित व मराठवाड्यातील प्रसिद्ध असलेली मांगिरबाबा यात्रा उत्सवाला उपस्थिती लावली आहे, या यात्रा उत्सवामध्ये ढोल ताशाच्या गजरात एवढ्या उधळत मांगीर बाबाचे दर्शन या भावी भक्तांनी घेतली असून या यात्रेमुळे परिसर आज भक्तीमध्ये झाल्याचे चित्र शेंद्रा येथे पाहायला मिळाले आहे.