महाड: रायगड प्राधिकरण किल्ल्याच्या संवर्धनासाठी, कोणाच्या सेवेसाठी नाही : प्रविण दरेकर
Mahad, Raigad | May 8, 2026 भारतीय जनता पार्टीचे नेते प्रवीण दरेकर यांच्या महाड दौऱ्यामध्ये सावरट हिरकणी वाडी या पंचक्रोशीतील गावांमधील असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. तसेच आमदार प्रविण दरेकर यांच्या प्रयत्नातून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी विकास कामांचे उद्घाटन दरेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंचक्रोशीतील नागरिकांनी रायगड विकास प्राधिकरणाच्या कामांच्या दरेकर यांच्याकडे तक्रारींचा पाढा वाचला. या विभागातील दुर्भिक्ष्य लक्षात घेऊन, मी रायगड विकास प्राधिकरण कामांचा आढावा घेणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच रायगड प्राधिकरण किल्ल्याच्या संवर्धनासाठी असून ते कोणाच्या सेवेसाठी नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.