कामठी: कार झाडावर आदळली आणि संपूर्ण कुटुंब झाले उध्वस्त, भाचिच्या लग्नाला जाणाऱ्या खैरी येथील कुटुंबाचा अपघात, तिघांचा मृत्यू
Kamptee, Nagpur | Apr 28, 2026 लग्नाच्या आनंदावर विरजण पडल्याची दुर्दैवी घटना वरूड-अमरावती मार्गावर घडली.कामठी तालुक्यातील खैरी येथील ननान्हे कुटुंब कारने (MH 40 KR 0721) भाचीच्या लग्नासाठी बुलढाण्याला जात असताना खडका फाट्याजवळ कारचे नियंत्रण सुटून ती झाडावर आदळली.या भीषण अपघातात कार चकणाचूर झाली असूनएकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. मृतकामध्ये समाधान किसण नान्हे - आजोबा,किरण गोपाल नान्हे - आई,दिया गोपाल नान्हे वय 3 वर्ष यांचा समावेश आहे