महाड: बारावीच्या निकालात मुंबई विभागात रायगड अव्वल
Mahad, Raigad | May 3, 2026 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मुंबई विभागांतर्गत फेब्रुवारी २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी (एचएससी) परीक्षेचा निकाल आज आनलाईन जाहीर झाला. यामध्ये रायगड जिल्ह्याने आपली यशाची परंपरा कायम ठेवत मुंबई विभागात आपले स्थान अव्वल राखले आहे. रायगडचा विज्ञान शाखेचा निकाल ९८.५७ टक्के लागला आहे. तर वाणीज्य शाखेचा ९१.२९ टक्के तर तांत्रिक विज्ञान शाखेचा निकाल ९२.४० टक्के झाले.