सेलू: कोटंबा फाट्यावर रोडलगत उभ्या असलेल्या नादुरुस्त ट्रकवर भरधाव दुचाकी आदळून एक जण ठार, सेलू पोलिसांत मृत्यूची नोंद
Seloo, Wardha | Nov 17, 2024 वर्धेच्या दिशेने भरधाव जात असलेली दुचाकी रोडलगत उभ्या असलेल्या नादुरुस्त ट्रकवर जाऊन आदळल्याने दुचाकी चालक जागीच ठार झाला. ही घटना वर्धा - नागपूर महामार्गावर कोटंबा फाट्याजवळ ता. 16 शनिवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास घडली. प्रणय गणेश खडगी वय 27 रा.वर्धा असे मृत पावलेल्या इसमाचे नाव आहे. अशी माहिती ता. 17 ला सेलू पोलिसांकडून प्राप्त झाली.