सेलू: शहरातील साई व्हाईट गोल्ड जिनिंगमध्ये कापूस खरेदीचा शुभारंभ, 1 हजार 500 क्विंटल कापसाची खरेदी
Seloo, Wardha | Nov 15, 2024 शहरातील रेहकी रोडवरील साई व्हाईट जिनिंगमध्ये ता. 15 शुक्रवारला सकाळी 11.30 वाजता कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. पहिल्याच दिवशी 1 हजार 500 क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. जिनिंगचे संचालक कपिल चांडक यांच्या हस्ते काटापूजन व कापूस उत्पादक शेतकऱ्याचा सत्कार करून कापूस खरेदीला प्रारंभ झाला.