सेलू: देशात ५ किलो मोफत धान्यासाठी लाईन लागते, खरच देशाची अर्थव्यवस्था सुधारली काय ? : काँग्रेस नेते कन्हयाकुमार
Seloo, Wardha | Nov 15, 2024 आपल्या देशात मोफत धान्य मिळविण्यासाठी ८० करोड लोक रांगा लावतात आणि जगात देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या स्थानी आहे. अशा बाता सत्ताधारी करतात. खरच देशाची देशाची अर्थव्यवस्था सुधारली काय? असा सवाल काँग्रेसचे नेते कन्हयाकुमार यांनी केला. ता. १४ गुरुवाराला दुपारी ३.३० वाजता विधानसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीचे वर्धा-सेलू मतदार संघातील उमेदवार शेखर शेंडे यांच्या प्रचारार्थ सेलू शहरातील रेहकी चौकात आयोजित सभेत ते बोलत होते.