सेलू: वडगाव रोडवर पतंगाच्या नॉयलान मांजाने गळा चिरून तरुण गंभीर जखमी
Seloo, Wardha | Nov 16, 2024 पतंगाच्या नॉयलान मांझाने दुचाकीस्वार तरुणाचा गळा कापल्याची घटना शुक्रवारी ता. 15 सायंकाळी 6.00 वाजताच्या सुमारास वडगांव रोडवर दवाखान्यासमोर घडली. नितीन घोडे रा. झडशी असे जखमी तरुणाचे नाव आहे. तो झडशी येथून सेलूकडे येतांना ही घटना घडली.