सेलू: सिंदी शहरात अवैध दारू विक्रेत्यांवर पोलिसांची धडक कारवाई, ८ लाख २१ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त
Seloo, Wardha | Nov 15, 2024 निवडणुकीच्या अनुषंगाने सिंदी शहरात पोलीसांनी अवैध दारू विक्रेत्यांवर धडक मोहीम राबवुन शहरात चोरून लपुन दारू विक्री करणाऱ्यांवर रेड करूण तसेच गावठी मोहा दारू बाबत वॉश आउट मोहीम राबवून गावठी दारू, देशी विदेशी दारू आणि 4 मोटरसायकलीसह 8 लाख 21 हजार 150 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई सिंदी पोलिसांनी ता. 14 गुरुवारी दुपारी 12 ते सायंकाळी 7.30 वाजताच्या दरम्यान करण्यात आली. अशी माहिती ता. 15 ला सिंदी पोलिसांकडून प्राप्त झाली.