मिशन आरोग्य अंतर्गत खेड, दापोली व मंडणगड पोलीस ठाण्यांमध्ये आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन
रत्नागिरी पोलीस दलामार्फत राबविण्यात येणाऱ्या मिशन आरोग्य अंतर्गत खेड, दापोली व मंडणगड पोलीस ठाणे येथे पोलीस अधिकारी व अंमलदारांसाठी ब्रीदोमेट्री, स्पायरोमेट्री तसेच जनरल मेडिकल चेकअप (सर्वसाधारण वैद्यकीय तपासणी) शिबिरांचे आयोजन करण्यात आले.
मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. शैलेश सणस यांच्या नेतृत्वाखाली सदर आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले.
या आरोग्य तपासणी शिबिरांसाठी परशुराम हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, लोटे यांचे वैद्यकीय सहकार्य लाभले.
CMO MAHARASHTRA Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Pawar उदय सामंत Yogesh Ramdas Kadam महाराष्ट्र पोलीस | Maharashtra Police IGP Konkan Range Nitin Bagate IPS #healthcamp #ratnagiri #ratnagiripolice
8 views | Ratnagiri, Maharashtra | Oct 13, 2026