रत्नागिरी पोलीस दलाच्या QRT पथकातील १८ जवानांना बोट सेलिंगचे प्रशिक्षण
रत्नागिरी येथील 2 महाराष्ट्र नेव्हल युनिट तर्फे दि. ०७/१०/२०२६ ते दि. १३/१०/२०२६ या कालावधीत Most Enterprising Naval Camp चे आयोजन करण्यात आले होते.
मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली, कॅम्प कमांडंट श्री. रामांजुल दीक्षित यांनी रत्नागिरी पोलीस दलाच्या QRT (Quick Response Team) पथकातील १८ जवानांना बोट सेलिंगचे प्रशिक्षण दिले.
या प्रशिक्षणामुळे रत्नागिरी पोलीस दलाची सागरी क्षेत्रातील कार्यक्षमता वाढून, आपत्कालीन परिस्थितीत जलद प्रतिसाद देणे व बचावकार्य अधिक प्रभावीपणे राबविण्यास मदत होऊन जिल्ह्यातील सागरी सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट होणार आहे.
CMO MAHARASHTRA Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Pawar उदय सामंत Yogesh Ramdas Kadam महाराष्ट्र पोलीस | Maharashtra Police IGP Konkan Range Nitin Bagate IPS #sailingtraining #ncc #ratnagiri #ratnagiripolice
7 views | Ratnagiri, Maharashtra | Oct 15, 2026