पालघर: पिंपळशेत- जव्हार येथे वडिलांनी पंधरा वर्षाच्या मुलाची हत्या करून स्वतः केली आत्महत्या
पिंपळशेत- जव्हार येथे वडिलांनी पंधरा वर्षाच्या मुलाची हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शरद भोये यांनी पिंपळशेत येथील शेतावरील घरात भावेश भोये या त्यांच्या मुलाचे डोके जमिनीवर आपटून दोरीने गळा आवळून त्याची हत्या केली. त्यानंतर दुसऱ्या खोलीत स्वतः गळफास घेत आत्महत्या केली घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले व घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. याप्रकरणी जव्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.