पालघर: पेल्हार परिसरात एका सोसायटीच्या आवारातील सांडपाण्याच्या टाकीत पडून सात वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू
पेल्हार परिसरात रिलायबल सोसायटी असून या सोसायटीच्या आवारात सात वर्षाची चिमुकली अफिफा मौलाना खेळत होती. जवळच सांडपाण्याची टाकी होती, मात्र टाकीचे झाकण गंजळल्याने खिळखिळे झाले होते. अफीफाचा पाय या सांडपाण्याच्या टाकीच्या झाकणावर पडला आणि ती सांडपाण्याच्या टाकीत पडली. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पेल्हार पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.