पालघर: मालजीपाडा, ससूननगर परिसरात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक संतप्त <nis:link nis:type=tag nis:id=Jansamasya nis:value=Jansamasya nis:enabled=true nis:link/>
पालजीपाडा ससून नगर परिसरात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना मोठा त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सातत्याने वीज पुरवठा खंडित होत असल्याचे प्रकार होत असल्याने वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर तासनतास वीज परत येत नाही. वीज ट्रीपिंगचे देखील प्रमाण वाढले असून यामुळे इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब होत असल्याचा नागरिकांचे म्हणणे आहे. वारंवार याबाबत तक्रार करून देखील याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे या संपूर्ण प्रकाराबाबत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.