पालघर: जिल्हाधिकारी कार्यालय येथे तारापूर अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षा राष्ट्रीय रंगीत तालीम संदर्भात चाप्रशिक्षण संपन्न
तारापूर अणुऊर्जा प्रकल्प येथे 14 मे रोजी प्रकल्पाच्या सुरक्षेच्या संदर्भात राष्ट्रीय रंगीत तालीम घेण्यात येणार आहे. अणुऊर्जा प्रकल्पात आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास प्रकल्पाच्या 18 किलोमीटर परिसरातील जनतेला सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व संबंधित विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी पोलीस आरोग्य महसूल, एनडीआरएफ, प्रादेशिक प्रतिसाद केंद्र, नागरी संरक्षण दल शिक्षण, पशुसंवर्धन, ग्रामपंचायत आदी विभागातील 250 हुन अधिक अधिकारी कर्मचारी सहभागी झाले.