उमरेड: बेला परिसरात अवैध दारूवर छापा; दोन भावांना अटक
Umred, Nagpur | May 13, 2026 नागपूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) मौजा शेडेश्वर येथे कारवाई करून अवैध दारू विक्री करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे. याप्रकरणी आरोपी: मारुती परसराम राऊत ( आणि गंगाधर परसराम राऊत यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी एकूण २२,६०० रुपये किमतीच्या देशी आणि विदेशी दारूच्या निपा जप्त केल्या आहेत.दोन्ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास बेला पोलीस करत आहेत.