नागपूर शहर: नागपुरात राईड लेट झाल्यामुळे वाद : प्रवाशाकडून रॅपिडो चालकाला मारहाण, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
नागपूर शहरात रॅपिडो बाईक चालकाला मारहाण करण्यात आल्याची एक घटना समोर आली असून, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका प्रवाशाने रॅपिडो ॲपवरून बाईक राईड बुक केली होती. मात्र, नमाजची वेळ झाल्यामुळे रॅपिडो चालक आणि प्रवासी यांच्यात वाद झाला. हा वाद विकोपाला जाऊन प्रवाशाने रॅपिडो चालकाला मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. हा संपूर्ण प्रकार कॅमेरात कैद झाला असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे