केंद्र शासनाच्या वतीने देशांमध्ये hpv लसीकरण कार्यक्रमाचा शुभारंभ मान .पंतप्रधान श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते 28 मार्च 2026 रोजी करण्यात आला सदर मोहिमेचा महाराष्ट्र तसेच जिल्ह्यामध्ये शुभारंभ आठ मार्च जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून करण्याचे निर्देश प्राप्त होते .त्यानुसार जिल्हा महिला व बाल रुग्णालय कुडाळ येथे मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या हस्ते सदर मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी दोन 14 वर्षे वयोगटातील मुलींना सदर मोहिमेंतर्गत लसीकरण करण्यात येऊन प्रमाणपत्र देखील देण्यात आले .यावेळी डॉ.श्रीपाद पाटील जिल्हा शल्य चिकित्सक सिंधुदुर्ग व डॉ.सई धुरी जिल्हा आरोग्य अधिकारी उपस्थित होेते.