काटोल: १.३४० किलो गांजासह माय लेकाला अटक, काटोल पोलिसांनी घुबडमेट येथे मारला छापा
Katol, Nagpur | Apr 18, 2026 काटोल पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे घूबडमेट येथे धाड टाकून १.३४० किलो गांजा जप्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी गणेश दिनदयाळ शेंगाय्या आणि त्याच्या आईला अटक केली असून, गांजा व रोख रकमेसह एकूण ३१,१४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपींविरुद्ध एन.डी.पी.एस. कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.