सावनेर: तहसील कार्यालय सावनेर येथे पुनर्वसित ग्रामस्थांना भूसंपादन मोबदला वाटप कार्यक्रमाचे आयोजन
Savner, Nagpur | Mar 28, 2026 📍 तहसील कार्यालय, सावनेर कोच्छी बॅरेज प्रकल्पाअंतर्गत ढालगाव खैरी येथील पुर्नवसित ग्रामस्थांना भूसंपादन मोबदला वाटप कार्यक्रम आज तहसील कार्यालय, सावनेर येथे पार पडला. या कार्यक्रमादरम्यान प्रकल्पग्रस्त बांधवांना त्यांच्या हक्काचा मोबदला पारदर्शक पद्धतीने वितरित करण्यात आला. यावेळी उपस्थित राहून ग्रामस्थांशी संवाद साधला व त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या, त्या सोडवण्यासाठी प्रशासनाने तत्परतेने कार्य करावे, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.