नोएडामध्ये आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरचा पर्दाफाश; १६४ परदेशी नागरिकांना बंधक ठेवून जबरदस्तीने काम करवून घेतल्याचा आरोप!
नोएडा, उत्तर प्रदेश : दिल्ली पोलिसांनी नोएडामधील एका मोठ्या आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरवर छापा टाकून कारवाई केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, येथे इंडोनेशियाचे ९२ आणि मलेशियाचे ७२ असे एकूण १६४ नागरिक काम करताना आढळले. त्यांना कथितरीत्या बंधक ठेवून जबरदस्तीने काम करवून घेतले जात असल्याचा आरोप आहे.
छापेमारीत ३५५ मोबाईल फोन, १६८ संगणक, २६ लॅपटॉप आणि पासपोर्ट जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
#NoidaNews #DelhiPolice #InternationalCallCenter #HumanTrafficking #BreakingNews
Pune City, Pune | Nov 27, 2026