पुण्यात भिडेवाडा ते महापालिका ‘सत्यशोधक रॅली’; महात्मा फुले यांच्या विचारांचा जागर
महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जन्मद्विशताब्दी वर्षानिमित्त पुणे महानगरपालिकेच्या वतीने भिडेवाडा ते पुणे महापालिका अशी ‘सत्यशोधक रॅली’ आयोजित करण्यात आली. संविधान पूजनाने रॅलीला सुरुवात झाली. महात्मा फुले यांच्या वेशभूषेतील कलाकार पारंपरिक बग्गीतून सहभागी झाले. अप्पा बळवंत चौकातून मार्गक्रमण करत रॅली महापालिकेत पोहोचली. त्यानंतर महापालिकेत अभिरूप सभेचे आयोजन करण्यात आले.
महात्मा फुले यांचे स्त्रीशिक्षण, सामाजिक समता आणि सत्यशोधक विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संदेश या रॅलीतून देण्यात आला. या उपक्रमाला नागरिकांचा सहभाग लाभला.
फील्ड रिपोर्ट: भाग्यलक्ष्मी दाश, पुणे.
Satyashodhak Rally Pune, Bhide Wada, Mahatma Jyotiba Phule, Phule Birth Bicentenary, Pune Municipal Corporation, PMC News, Savitribai Phule, Social Equality, Women Education, Pune News
#SatyashodhakRally #MahatmaJyotibaPhule #SavitribaiPhule #PuneNews #PuneMunicipalCorporation
Pune City, Pune | Nov 27, 2026