नागपूर शहर: विदर्भ दुष्काळग्रस्त, सरकार राजकारणात व्यस्त: आमदार रोहित पवार यांचा गंभीर आरोप
विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची तीव्र तूट निर्माण झाली असून शेतकरी संकटात सापडले आहेत. मात्र, राज्याचे सरकार केवळ राजकारणात व्यस्त असल्याची घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. नागपूर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी विदर्भातील दुष्काळी परिस्थितीवर चिंता व्यक्त करत शासनाकडे तात्काळ मदतीची मागणी केली.