कामठी: जुनी कामठी पोलिसांची धडक कारवाई: एम.डी. पावडरसह दोघे अटकेत
Kamptee, Nagpur | Jun 24, 2026 'ऑपरेशन थंडर' अंतर्गत जुनी कामठी पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी मोहिमेत मोठी कारवाई केली आहे. २४ जून रोजी पहाटेच्या सुमारास जुनी कामठी पोलिसांनी संशयावरून दोन इसमांना थांबवून तपासणी केली. त्यांच्याकडून १२.६५ ग्रॅम एम.डी. पावडर, दोन मोबाईल आणि एक दुचाकी असा एकूण १ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.