बदनापूर: केळीगव्हाण येथे मुख्यमंत्री सहायता निधीतून समृद्धी महामार्गावर मृतांच्या वारसांना धनादेशाचे करण्यात आले वितरण
आज दिनांक 9 एप्रिल 2026वार गुरुवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास बदनापूर तालुक्यातील केळीगव्हाण येथे महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 5 लाख रुपये आर्थिक मदतीच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले आहे, एक एप्रिल रोजी समृद्धी महामार्गावर बदनापूर तालुक्यात भीषण अपघात होऊन केळी गव्हाण येथील लक्ष्मीबाई मदन ताराबाई चौधरी काळुबाई मदन यांचा मृत्यू झाला होता त्यांच्या वारसांना आज माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर, आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते धनादेश वितरित करण्यात आले.