प्रवाशांच्या दागिन्यांना लक्ष्य करणाऱ्या चोरट्यांवर कोल्हापूर पोलिसांची कारवाई!
बस स्टँडवर प्रवाशांचे दागिने चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील महिलेस कळे पोलिसांनी अटक करून तिच्याकडून ₹१.४० लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
तसेच, गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या टोळीतील सदस्याला जेरबंद करत ₹६.०३ लाख किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले.
🔍 सीसीटीव्ही, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत चोरीच्या गुन्ह्यांचा तपास लावला.
🚔 प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी कोल्हापूर पोलिसांची सतर्क नजर!
प्रवासादरम्यान मौल्यवान दागिने व वस्तूंची काळजी घ्या.
#KolhapurPolice #CrimeControl #Theft #PassengerSafety #Ganeshotsav2026
26 views | Kolhapur, Maharashtra | Sep 21, 2026