गारगोटी रोडवरील सोन्याचे मंगळसूत्र चोरीचा छडा!
गारगोटी रोडवरील मेजवानी हॉटेलसमोर बसमध्ये चढताना महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरीला गेले होते. या घटनेचा गुन्हे अन्वेषण शाखेने CCTV फुटेज व तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करत संशयित महिला आरोपीचा शोध घेतला.
👮♀️ आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर चौकशीत चोरीची कबुली मिळाली.
💍 २१.१८० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र जप्त करण्यात आले.
💰 जप्त मुद्देमालाची किंमत ₹१,५२,००० आहे.
आरोपी व मुद्देमाल पुढील कारवाईसाठी मुरगूड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला.
कोल्हापूर पोलिसांची तत्पर कारवाई! 🚔
#KolhapurPolice #Kolhapur #CrimeBranch #PoliceAction #GoldTheft