Public App Logo
Profile Picture

कोल्हापूर पोलीस

@kolhapurpolice
127Followers
0Following
विवाह आणि प्रेमसंबंधांच्या नावाने होणाऱ्या ऑनलाइन फसवणुकीपासून सावध रहा!

मॅट्रिमोनियल वेबसाइट किंवा सोशल मीडियावर झालेली ओळख खरी असेलच असे नाही. विश्वास संपादन करून पैशांची मागणी करणाऱ्या व्यक्तींपासून सावध रहा. ओळख पडताळल्याशिवाय पैसे पाठवू नका.

📞 सायबर फसवणूक झाल्यास त्वरित १९३० वर संपर्क साधा.

<nis:link nis:type=tag nis:id=cyberawareness nis:value=CyberAwareness nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=onlinefraud nis:value=OnlineFraud nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=kolhapurpolice nis:value=KolhapurPolice nis:enabled=true nis:link/>
कोल्हापुरात एम.डी. ड्रग्स व गांजा जप्त; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व राजारामपुरी पोलिसांची संयुक्त कारवाई!

कोल्हापूर शहरातील शास्त्रीनगर परिसरात अमली पदार्थांची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या इसमाविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत ५२ ग्रॅम गांजा व १५ ग्रॅम एम.डी. ड्रग्ससह एकूण ₹२,१०,००० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अमली पदार्थांविरोधात कोल्हापूर पोलिसांची कठोर कारवाई सुरूच!

<nis:link nis:type=tag nis:id=kolhapurpolice nis:value=KolhapurPolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=drugfreekolhapur nis:value=DrugFreeKolhapur nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=antidrugoperation nis:value=AntiDrugOperation nis:enabled=true nis:link/>
बनावट ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटपासून सावध रहा!

₹९,९९९ चे शूज फक्त ₹९९९ मध्ये? अवास्तव स्वस्त ऑफर्सच्या आमिषाला बळी पडू नका. खरेदीपूर्वी वेबसाइटची विश्वासार्हता तपासा आणि संशयास्पद लिंकवरून पेमेंट करणे टाळा.

📞 सायबर फसवणूक झाल्यास त्वरित १९३० वर संपर्क साधा.

<nis:link nis:type=tag nis:id=cyberawareness nis:value=CyberAwareness nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=onlineshoppingfraud nis:value=OnlineShoppingFraud nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=maharashtracyber nis:value=MaharashtraCyber nis:enabled=true nis:link/>
दर्शनासाठी आलेल्या महिलेचे मंगळसूत्र चोरीला; ₹१.५० लाखांचा मुद्देमाल जप्त!

आदमापूर येथील संत बाळूमामा मंदिरात दर्शनासाठी आलेल्या महिलेचे मंगळसूत्र चोरीला गेल्याप्रकरणी मुरगूड पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे तपास करून कोल्हापुरातील रेल्वे फाटक परिसरातून महिला आरोपीला ताब्यात घेतले.

👮‍♀️ ११.५ ग्रॅम वजनाचे, ₹१,५०,००० किमतीचे मंगळसूत्र जप्त करण्यात आले असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

<nis:link nis:type=tag nis:id=kolhapurpolice nis:value=KolhapurPolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=crimedetection nis:value=CrimeDetection nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=kolhapur nis:value=Kolhapur nis:enabled=true nis:link/>
🚦 गोकुळ दूध संघ निवडणूक प्रक्रियेसाठी कोल्हापूर शहरात वाहतुकीत बदल!

गोकुळ दूध संघ निवडणुकीच्या अनुषंगाने दि. १७ ऑक्टोबर रोजी मतपेटी वाटप, १८ ऑक्टोबर रोजी मतदान व मतपेटी संकलन आणि १९ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे.

या कालावधीत रमणमळा बहुउद्देशीय हॉल व स्वामी विवेकानंद महाविद्यालय परिसरात वाहतुकीत बदल व काही मार्गांवर प्रवेश बंद राहणार आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे.

<nis:link nis:type=tag nis:id=kolhapurpolice nis:value=KolhapurPolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=trafficupdate nis:value=TrafficUpdate nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=kolhapur nis:value=Kolhapur nis:enabled=true nis:link/>
झटपट कर्जाच्या आमिषाला बळी पडू नका!

“Instant Loan, No Documents Required” अशा जाहिरातींपासून सावध रहा. अनोळखी Loan Apps डाउनलोड करू नका आणि Contacts, Gallery यांसारख्या वैयक्तिक माहितीचा अनावश्यक ॲक्सेस देऊ नका.

🛡️ ॲपची विश्वासार्हता पडताळा, आपली माहिती सुरक्षित ठेवा.

📞 सायबर फसवणूक झाल्यास 1930 वर संपर्क साधा.

<nis:link nis:type=tag nis:id=cyberawareness nis:value=CyberAwareness nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=fakeloanapps nis:value=FakeLoanApps nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=kolhapurpolice nis:value=KolhapurPolice nis:enabled=true nis:link/>
खोट्या शेअर ट्रेडिंगच्या आमिषाला बळी पडू नका!

“दर महिन्याला 15–20% हमखास नफा” अशा अवास्तव आश्वासनांपासून सावध रहा. गुंतवणूक करण्यापूर्वी ट्रेडिंग प्लॅटफॉर्मची अधिकृतता पडताळा. झटपट मोठ्या नफ्याच्या आमिषात आपली मेहनतीची कमाई गमावू नका!

📞 सायबर फसवणूक झाल्यास त्वरित 1930 वर संपर्क साधा.

<nis:link nis:type=tag nis:id=cyberawareness nis:value=CyberAwareness nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=sharetradingfraud nis:value=ShareTradingFraud nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=kolhapurpolice nis:value=KolhapurPolice nis:enabled=true nis:link/>
कोल्हापुरात गांजा विक्रीचा पर्दाफाश!

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माळीवाडा, उचगाव येथे कारवाई करत गांजा विक्रीसाठी आलेल्या दोन इसमांना अटक केली.

🔹 १० किलो गांजा जप्त — अंदाजे किंमत ₹६ लाख
🔹 एक दुचाकी आणि तीन मोबाईल हँडसेट जप्त
🔹 एकूण ₹६,६०,००० किमतीचा मुद्देमाल हस्तगत

दोन्ही संशयितांविरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल असून, पुढील तपास गांधीनगर पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.

🚔 अमली पदार्थांविरोधात कोल्हापूर पोलिसांची कारवाई सुरूच!

<nis:link nis:type=tag nis:id=kolhapurpolice nis:value=KolhapurPolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=antidrugaction nis:value=AntiDrugAction nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ndpsact nis:value=NDPSAct nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=kolhapur nis:value=Kolhapur nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=maharashtrapolice nis:value=MaharashtraPolice nis:enabled=true nis:link/>
सायबर जनजागृती अभियान | NIT, कोल्हापूर

न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (NIT), कोल्हापूर येथे सायबर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल साहेब आणि सायबर पोलीस निरीक्षक संजय हरुगडे उपस्थित होते.

विद्यार्थ्यांमध्ये सायबर गुन्हे, ऑनलाइन फसवणूक आणि डिजिटल सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी या कार्यक्रमातून मार्गदर्शन करण्यात आले.

🛡️ जागरूक रहा • सतर्क रहा • सायबर सुरक्षित रहा!

<nis:link nis:type=tag nis:id=cyberawareness nis:value=CyberAwareness nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=nitkolhapur nis:value=NITKolhapur nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=kolhapurpolice nis:value=KolhapurPolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=maharashtrapolice nis:value=MaharashtraPolice nis:enabled=true nis:link/>
🚨 ई-चलानचा मेसेज आला? सावध रहा!

“Your traffic challan is pending. Pay now!” असा मेसेज आणि अनोळखी लिंक आल्यास लगेच क्लिक करू नका. ⚠️

❌ बनावट ई-चलान लिंकपासून सावध रहा
✅ चलानची माहिती फक्त अधिकृत वेबसाइटवर तपासा
🔐 अनोळखी लिंकवर बँकिंग किंवा वैयक्तिक माहिती भरू नका

सायबर फसवणूक झाल्यास तात्काळ १९३० वर संपर्क करा.

क्लिक करण्याआधी पडताळा… सायबर सुरक्षितता जपा! 🛡️

<nis:link nis:type=tag nis:id=cyberawarenessmonth nis:value=CyberAwarenessMonth nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=fakechallanscam nis:value=FakeChallanScam nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=cybersafety nis:value=CyberSafety nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=kolhapurpolice nis:value=KolhapurPolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=maharashtracyber nis:value=MaharashtraCyber nis:enabled=true nis:link/>
नवरात्रोत्सव २०२६ : कोल्हापूर शहरातील वाहतुकीत महत्त्वाचे बदल!

श्री अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन वाहतूक सुरळीत व सुरक्षित ठेवण्यासाठी कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे.

🚛 अवजड वाहनांना प्रवेशबंदी: संबंधित अधिसूचनेनुसार सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत शहरातील प्रवेशबंदी कायम राहील.

🚫 अंबाबाई मंदिर परिसरात अवजड वाहनांना रात्री ८ ते १० वाजेपर्यंत वाढीव प्रवेशबंदी लागू राहील.

📍 नागरिकांनी वाहतूक बदलांची नोंद घ्यावी, पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे.

आपली सुरक्षितता, आपली जबाबदारी! 🙏🚔

<nis:link nis:type=tag nis:id=kolhapurpolice nis:value=KolhapurPolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=navratri2026 nis:value=Navratri2026 nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=trafficadvisory nis:value=TrafficAdvisory nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=kolhapurtraffic nis:value=KolhapurTraffic nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=नवरात्रोत्सव nis:value=नवरात्रोत्सव nis:enabled=true nis:link/>
UPI पेमेंटचा Screenshot म्हणजे पेमेंट झाल्याचा पुरावा नाही!

शेतकरी बांधवांनो, ग्राहकाने पेमेंट केल्याचे दाखवले तरी खात्यात पैसे जमा झाल्याची खात्री करा. 🏦

✅ Screenshot नव्हे, बँक खात्यातील व्यवहार तपासा!

🛡️ पडताळा • मगच व्यवहार करा!

<nis:link nis:type=tag nis:id=maharashtracyber nis:value=MaharashtraCyber nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=cyberawareness nis:value=CyberAwareness nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=upifraud nis:value=UPIFraud nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=सायबरसुरक्षा nis:value=सायबरसुरक्षा nis:enabled=true nis:link/>
बँक खाते फ्रीझ किंवा लीन झालंय?
सायबर गुन्ह्यांच्या तपासामुळे फ्रीझ किंवा लीन-मार्क झालेल्या खात्यांसंबंधी तक्रारींसाठी GRM पोर्टलद्वारे प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे.
⚠️ तक्रार केल्याने खाते आपोआप अनफ्रीझ होत नाही. अंतिम निर्णय तपास आणि उपलब्ध पुराव्यांवर अवलंबून असतो.
जागरूक रहा • सुरक्षित रहा!
<nis:link nis:type=tag nis:id=maharashtracyber nis:value=MaharashtraCyber nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=cyberawareness nis:value=CyberAwareness nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=grm nis:value=GRM nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=cybersafety nis:value=CyberSafety nis:enabled=true nis:link/>
सायबर जनजागृती अभियान!
सायबर सुरक्षा महिन्यानिमित्त कोल्हापूर पोलिसांची LED जनजागृती व्हॅन जिल्हाभर फिरून नागरिकांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागृती करणार.
मा. पोलीस अधीक्षक नीलोत्पल साहेब यांच्या हस्ते शुभारंभ. यावेळी PI संजय हरुगडे व सायबर विभागातील अधिकारी-अंमलदार उपस्थित.
जागरूक रहा • सायबर सुरक्षित रहा! 🛡️
<nis:link nis:type=tag nis:id=cyberawarenessmonth nis:value=CyberAwarenessMonth nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=kolhapurpolice nis:value=KolhapurPolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=cybersafety nis:value=CyberSafety nis:enabled=true nis:link/>
अशी Link आली? थांबा… क्लिक करण्याआधी विचार करा! 🔐

“Congratulations! तुम्ही ₹10,000 जिंकले!” अशा आकर्षक ऑफर्सच्या नावाने आलेल्या अनोळखी लिंकवर क्लिक करू नका.

सायबर गुन्हेगार बनावट ऑफर, लिंक आणि मेसेजच्या माध्यमातून तुमची वैयक्तिक किंवा आर्थिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करू शकतात.

🔗 अनोळखी लिंक — सावधान!
👤 अनोळखी Sender — तपासा!
⚠️ आकर्षक Offer — आधी सत्यता पडताळा!

एका चुकीच्या क्लिकने फसवणूक होऊ शकते.

🛡️ क्लिक करण्याआधी विचार करा.
जागरूक रहा • सुरक्षित रहा

<nis:link nis:type=tag nis:id=cyberawarenessmonth nis:value=CyberAwarenessMonth nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=cybersafety nis:value=CyberSafety nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=cyberawareness nis:value=CyberAwareness nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=kolhapurpolice nis:value=KolhapurPolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=maharashtrapolice nis:value=MaharashtraPolice nis:enabled=true nis:link/>
सायबर अवेअरनेस मंथ | १ ते ३१ ऑक्टोबर

सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी जागरूकता आणि सतर्कता अत्यंत महत्त्वाची आहे.

सायबर सुरक्षेबाबत नागरिकांना मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक संजय हारुगडे, सायबर पोलीस ठाणे, कोल्हापूर यांनी नागरिकांनी ऑनलाइन व्यवहार करताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले.

📱 संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका
🔐 OTP, UPI PIN किंवा पासवर्ड कुणालाही सांगू नका
🚨 सायबर फसवणूक झाल्यास तात्काळ १९३० वर संपर्क करा.

जागरूक रहा. सतर्क रहा. सायबर सुरक्षित रहा! 🛡️

<nis:link nis:type=tag nis:id=cyberawarenessmonth nis:value=CyberAwarenessMonth nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=cybersafety nis:value=CyberSafety nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=cybercrimeawareness nis:value=CyberCrimeAwareness nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=kolhapurpolice nis:value=KolhapurPolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=maharashtrapolice nis:value=MaharashtraPolice nis:enabled=true nis:link/>
🚨 सावधान! CAPTCHA भरून ऑनलाइन नोकरी मिळवून देण्याच्या आमिषाला बळी पडू नका!

“घरबसल्या काम करा”, “अनुभवाची गरज नाही”, “दररोज पेमेंट” आणि “₹30,000–₹50,000 कमवा” अशा आकर्षक ऑफर्सच्या माध्यमातून सायबर फसवणूक होऊ शकते.

❌ अनोळखी लिंकवर क्लिक करू नका
❌ OTP, बँक तपशील किंवा वैयक्तिक माहिती शेअर करू नका
❌ नोकरीच्या नावाखाली पैसे भरणे टाळा
✅ कंपनीची अधिकृत वेबसाइट व माहिती तपासा
✅ फसवणूक झाल्यास तात्काळ 1930 वर संपर्क करा किंवा mhcyber.gov.in वर तक्रार नोंदवा.

🔐 जागरूक रहा… सुरक्षित रहा!

<nis:link nis:type=tag nis:id=cyberawarenessmonth nis:value=CyberAwarenessMonth nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=cybersafety nis:value=CyberSafety nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=cybercrime nis:value=CyberCrime nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=onlinejobscam nis:value=OnlineJobScam nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=jobscam nis:value=JobScam nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=cyberfraud nis:value=CyberFraud nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=staycybersafe nis:value=StayCyberSafe nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=maharashtracyber nis:value=MaharashtraCyber nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=spokolhapur nis:value=SPOKolhapur nis:enabled=true nis:link/>
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🙏

सत्य, अहिंसा, स्वच्छता आणि शांततेचा मार्ग दाखवणाऱ्या महात्मा गांधी यांच्या विचारांना आजच्या दिवशी मनःपूर्वक नमन.

“स्वच्छता, सत्य आणि अहिंसा” या मूल्यांना आपल्या आचरणातून पुढे नेऊया.

🌿 गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

<nis:link nis:type=tag nis:id=gandhijayanti nis:value=GandhiJayanti nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=mahatmagandhi nis:value=MahatmaGandhi nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=gandhijayanti2026 nis:value=GandhiJayanti2026 nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=maharashtrapolice nis:value=MaharashtraPolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=kolhapurpolice nis:value=KolhapurPolice nis:enabled=true nis:link/>
५२ वी कोल्हापूर जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा २०२६ 🏆

कोल्हापूर पोलीस दलातील खेळाडूंच्या जिद्द, शिस्त आणि क्रीडा कौशल्याचा उत्साहपूर्ण सोहळा! 💪

पोलीस मुख्यालय, कोल्हापूर येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत १४० पुरुष व महिला खेळाडू विविध क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी झाले आहेत. 🏃‍♂️⚽🏐🏆

मैदानावरचा प्रत्येक प्रयत्न, प्रत्येक क्षण आणि प्रत्येक विजय पोलीस दलाच्या क्रीडाभावनेची ओळख करून देतो.

जिद्द मैदानावर… शिस्त मनात… विजयाची आस कायम! 🇮🇳

<nis:link nis:type=tag nis:id=kolhapurpolice nis:value=KolhapurPolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=policesports2026 nis:value=PoliceSports2026 nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=policekreedaspardha nis:value=PoliceKreedaSpardha nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=kolhapur nis:value=Kolhapur nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=maharashtrapolice nis:value=MaharashtraPolice nis:enabled=true nis:link/>
OTP आला? मग तो फक्त तुमच्यासाठीच!

तुमचा OTP म्हणजे तुमच्या खात्याची सुरक्षा करणारी महत्त्वाची किल्ली आहे.
कोणीही फोन करून, मेसेज करून किंवा कोणत्याही कारणाने OTP मागितला तरी तो कुणालाही सांगू नका. 🚫

⚠️ OTP शेअर केला = फसवणुकीचा धोका!
जागरूक रहा, सावध रहा आणि सुरक्षित रहा. 🛡️

<nis:link nis:type=tag nis:id=cyberawareness nis:value=CyberAwareness nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=cybersafety nis:value=CyberSafety nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=otp nis:value=OTP nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=kolhapurpolice nis:value=KolhapurPolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=maharashtracyber nis:value=MaharashtraCyber nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=सायबरसुरक्षा nis:value=सायबरसुरक्षा nis:enabled=true nis:link/>
बाप्पाला निरोप देताना… सायबर फसवणुकीपासूनही सावध राहा!

गणपती विसर्जनाच्या उत्साहात गर्दीचा फायदा घेऊन सायबर गुन्हेगारांकडून डोनेशन, प्रसाद किंवा दर्शनाच्या नावाने बनावट लिंक, QR कोड किंवा मेसेज पाठवून फसवणूक केली जाऊ शकते.

🔐 अनोळखी लिंकवर क्लिक करू नका
📱 अनोळखी QR कोड स्कॅन करू नका
❌ OTP किंवा UPI PIN कोणालाही सांगू नका

सायबर फसवणूक झालीच तर घाबरू नका.
📞 तात्काळ १९३० वर संपर्क करा.

बाप्पाला निरोप… सायबर फसवणुकीला नाही! 🙏🚔

गणपती बाप्पा मोरया! 🚩

<nis:link nis:type=tag nis:id=kolhapurpolice nis:value=KolhapurPolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=cybersafety nis:value=CyberSafety nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ganpativisarjan nis:value=GanpatiVisarjan nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=cybercrime nis:value=CyberCrime nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=1930 nis:value=1930 nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ganpatibappamorya nis:value=GanpatiBappaMorya nis:enabled=true nis:link/>
बाप्पाला निरोप… सुरक्षिततेला होकार! 🚔

गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीत उत्साहासोबतच सुरक्षिततेची काळजी घेऊया.

👨‍👩‍👧 गर्दीत लहान मुलांची काळजी घ्या
📱 मोबाईल, पाकीट व मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवा
🚗 वाहतूक नियमांचे पालन करा
🚫 धोकादायक स्टंट आणि मद्यपान करून वाहन चालवणे टाळा
👮 पोलिसांच्या सूचनांचे पालन करा
📞 आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ पोलिसांशी संपर्क साधा.

उत्सवाचा आनंद घ्या… पण सुरक्षिततेची जबाबदारीही जपा!

गणपती बाप्पा मोरया! 🙏🚩

<nis:link nis:type=tag nis:id=ganpativisarjan nis:value=GanpatiVisarjan nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=safeganeshotsav nis:value=SafeGaneshotsav nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=kolhapurpolice nis:value=KolhapurPolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ganpatibappamorya nis:value=GanpatiBappaMorya nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=safetyfirst nis:value=SafetyFirst nis:enabled=true nis:link/>
प्रवाशांच्या दागिन्यांना लक्ष्य करणाऱ्या चोरट्यांवर कोल्हापूर पोलिसांची कारवाई!

बस स्टँडवर प्रवाशांचे दागिने चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील महिलेस कळे पोलिसांनी अटक करून तिच्याकडून ₹१.४० लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

तसेच, गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या टोळीतील सदस्याला जेरबंद करत ₹६.०३ लाख किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले.

🔍 सीसीटीव्ही, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत चोरीच्या गुन्ह्यांचा तपास लावला.

🚔 प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी कोल्हापूर पोलिसांची सतर्क नजर!

प्रवासादरम्यान मौल्यवान दागिने व वस्तूंची काळजी घ्या.

<nis:link nis:type=tag nis:id=kolhapurpolice nis:value=KolhapurPolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=crimecontrol nis:value=CrimeControl nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=theft nis:value=Theft nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=passengersafety nis:value=PassengerSafety nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ganeshotsav2026 nis:value=Ganeshotsav2026 nis:enabled=true nis:link/>
बाप्पाला निरोप… सुरक्षिततेला होकार! 🚦🚔

गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीत उत्साहासोबतच वाहतुकीची शिस्त आणि सुरक्षिततेची काळजी घेऊया.

🚦 वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करा
🚗 मिरवणुकीच्या मार्गावर वाहने अनधिकृतपणे पार्क करू नका
🏍️ दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर करा
🚫 धोकादायक स्टंट आणि मद्यपान करून वाहन चालवणे टाळा
📱 वाहन चालवताना मोबाईलचा वापर करू नका
👨‍👩‍👧 गर्दीत लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांची काळजी घ्या

मिरवणूक आनंदाची… वाहतूक शिस्तीची… आणि विसर्जन सुरक्षिततेचे!

🚔 इचलकरंजी वाहतूक शाखेचे आवाहन — नियम पाळा, सहकार्य करा आणि सुरक्षित गणेशोत्सव साजरा करा.

गणपती बाप्पा मोरया! 🙏🚩

<nis:link nis:type=tag nis:id=ichalkaranjitraffic nis:value=IchalkaranjiTraffic nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ganpativisarjan nis:value=GanpatiVisarjan nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=safeganeshotsav nis:value=SafeGaneshotsav nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=trafficsafety nis:value=TrafficSafety nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=kolhapurpolice nis:value=KolhapurPolice nis:enabled=true nis:link/>
अफूच्या अमली पदार्थाविरोधात कोल्हापूर पोलिसांची कारवाई!

अवैध अमली पदार्थांचा साठा व विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई करत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांनी कणेरीवाडी येथील बालाजीनगर परिसरात छापा टाकून एका इसमास ताब्यात घेतले.

गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या कारवाईत आरोपीकडून सुमारे ७ किलो अफू अमली पदार्थाची तयार पावडर तसेच इतर साहित्य असा एकूण ₹१ लाख किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अमली पदार्थांची विक्री व साठा करणाऱ्यांविरोधात कोल्हापूर पोलिसांची कारवाई सुरूच आहे. 🚔

नशामुक्त समाजासाठी सजग राहूया!
अमली पदार्थांना नाही म्हणूया. ❌💊

<nis:link nis:type=tag nis:id=kolhapurpolice nis:value=KolhapurPolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=drugfreekolhapur nis:value=DrugFreeKolhapur nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=saynotodrugs nis:value=SayNoToDrugs nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=nashamuktbharat nis:value=NashaMuktBharat nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=drugfreesociety nis:value=DrugFreeSociety nis:enabled=true nis:link/>