कामठी: कामठीत भीमगर्जना! डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शहरातून काढण्यात आली भव्य मिरवणूक
Kamptee, Nagpur | Apr 14, 2026 भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीचे औचित्य साधून आज कामठी शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. विविध सामाजिक संघटना आणि उत्सव समितीच्या वतीने शहरातून अत्यंत शिस्तबद्ध आणि भव्य रॅली काढण्यात आली, ज्यामध्ये हजारो भीमअनुयायी सहभागी झाले होते.स्थानिक मुख्य चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.