सावनेर: अप्पर तहसील साठी जल सुनावणीत चिंचोली चणकापूरची अल्प उपस्थिती, दोन सरपंचांनी सांभाळली बाजू
Savner, Nagpur | Jul 9, 2026 सावनेर येथे झालेल्या अप्पर तहसील कार्यालयासंदर्भातील जन सुनावणी मध्ये पाटण सांगी सर्कल मधून 50 हून अधिक प्रतिनिधींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला मात्र चिचोली चणकापूर सर्कल मधून केवळ चिचोरीच्या सरपंच मीनाक्षी ताबडे व शिंदे वाघाचे सरपंच मधुकर दुकाने हेच उपस्थित राहून परिसराची बाजू प्रशासना समोर मांडताना दिसले सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर मागणी होत असतानाही प्रत्यक्ष सुनावणीत अल्प उपस्थिती राहिल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे