महाड: सावित्री नदीवरील पुलाच्या देखभालीकडे दुर्लक्ष
Mahad, Raigad | Apr 6, 2026 मुंबई-गोवा महामार्गावरील सावित्री पुल दुर्घटनेची दहा वर्षे पूर्ण होत असतानाच महाडकडून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या फुलांच्या भिंतीवर मोठे वृक्ष निर्माण झाल्याचे दिसून येत आहेत. यामुळे पुन्हा एकदा सावित्री पूल कमकुवत होऊन दुर्घटना होण्याची भीती प्रवासी वर्गातून व्यक्त होत आहे. यासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग विभागाने तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांनी बोलून दाखविली.