कामठी: 'ऑपरेशन थंडर' अंतर्गत कामठीत मोठी कारवाई; प्रतिबंधित सुगंधी तंबाखू व मशिनसह तिघांना अटक
“ऑपरेशन थंडर – एकत्र येऊया, नशामुक्त समाज घडवूया” या मोहिमेला मोठे यश आले आहे. अंमली पदार्थ विक्री आणि साठा करणाऱ्यांविरुद्ध सुरू असलेल्या धडक कारवाई अंतर्गत, नवीन कामठी परिसरातून प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आणि तो बनविणाऱ्या मशिन्स असा एकूण ९८,९५० रुपयांचामुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुन्हे शाखा सोनसाखळी विरोधी पथक आणि अन्न सुरक्षा अधिकारी यांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे नवीन कामठी येथील कळमणा रोडवरील एका घरावर छापा टाकला.