सावनेर: सावनेर नगर परिषदेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर, शाळा दुरुस्ती आणि निविदा प्रक्रियेवरून गंभीर आरोप
Savner, Nagpur | Jul 4, 2026 पावसाळ्यात तोंडावर आलेला असतानाच सावनेर नगर परिषदेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षातील अंतर्गत कलह आता पूर्णपणे उघडा झालेला आहे शहरातील घनकचरा व्यवस्थापन आणि नालेसफाईच्या निविदा प्रक्रियेला तातडीने स्थगिती द्यावी अन्यथा सात दिवसात पालिकेसमोर साखळी उपोषणाला बसू असा आक्रमक इशारा सत्ताधारी पक्षाच्या नाराज नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांना दिला आहे