रामटेक: गुप्तचर विभागाच्या नागपूर ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतला नवरगाव शिवारातील शेतात पुरलेला मृतदेह
Ramtek, Nagpur | Mar 9, 2026 सोमवार दिनांक 9 मार्चला दुपारी पोलीस स्टेशन रामटेक अंतर्गत येणाऱ्या नवरगाव परिसरातील एका शेतात काही महिन्यापूर्वी संशयीतपणे पुरलेल्या मृतदेहाला बाहेर काढून तो वैद्यकीय तपासणीसाठी नागपूरला पाठवल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.नागपूर ग्रामीण पोलीस गुप्तचर विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. यातील चार संशयितांना तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.