"मिशन आरोग्य" अंतर्गत पोलीस मुख्यालय, रत्नागिरी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन.
मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली "मिशन आरोग्य" अंतर्गत पोलीस मुख्यालय,रत्नागिरी येथे रत्नागिरी जिल्हा वाहतूक शाखा व "सेवा संकल्प" उपक्रमाच्या सहभागातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमाच्या माध्यमातून पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच नागरिकांमध्ये रक्तदानाचे महत्त्व व सामाजिक जबाबदारीबाबत जनजागृती करण्यात आली. तसेच, "मिशन प्रबोधन" अंतर्गत सायबर फसवणुकीपासून संरक्षण तसेच अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत उपस्थित पोलीस अधिकारी, अंमलदार व नागरिकांना आवश्यक माहिती देऊन जनजागृती करण्यात आली.या रक्तदान शिबिरास पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग नोंदविला.
CMO MAHARASHTRA Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Pawar उदय सामंत Yogesh Ramdas Kadam महाराष्ट्र पोलीस | Maharashtra Police IGP Konkan Range Nitin Bagate IPS #blooddonation #ratnagiri #r
59 views | Ratnagiri, Maharashtra | Oct 13, 2026